तुषार नाईक निंबाळकर व विजयकुमार लोंढे पाटील यांची श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या संचालक मंडळावर नियुक्ती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण दि. 23: फलटण शहरातील संस्थानकालीन श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या संचालक मंडळावर तुषार नाईक निंबाळकर व विजयकुमार लोंढे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांचा यथोचित सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्री शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. अजय शिंदे यांचे अध्यक्षतेखाली वाचनालयाचे सभागृहात संपन्न झालेल्या या छोटेखानी समारंभास संस्थेचे सेक्रेटरी श्रीकृष्ण देशपांडे, संचालक सुभाषराव भांबुरे, रविंद्र बर्गे, रविंद्र फौजदार, विलासराव बोरावके यांच्यासह सभासद उपस्थित होते.

सुमारे 150 वर्षापेक्षा अधिक काळाची उज्वल परंपरा लाभलेल्या या वाचनालयाने वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन केले असल्याने फलटण करांना या संस्थेबद्दल आदर, आपुलकी, प्रेम भावना आहे.

दरम्यान, सदर नियुक्तीबद्दल तुषार नाईक निंबाळकर व विजयकुमार लोंढे पाटील यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!