प्रदेश भाजपाच्या विविध मोर्चा, आघाड्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । मुंबई । भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चाच्या प्रमुखपदी संजय गाते, अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी दिलीप कांबळे तर किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी गणेश भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पक्षाच्या सर्व प्रदेश मोर्चे, आघाड्या प्रमुखांची घोषणा करण्यात आली असून परराष्ट्र संबंध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, विधानसभा विस्तारक योजना यांच्या प्रदेश संयोजकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.

अन्य मोर्चा, आघाड्यांच्या अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणेः

 

क्र. नाव पद
1. श्री.संजय गाते (वर्धा) प्रदेश अध्यक्ष, ओबीसी मोर्चा
2. श्री.उत्तमराव इंगळे(यवतमाळ) प्रदेश अध्यक्ष, अनुसूचित जमाती मोर्चा
3. श्री.दिलीप कांबळे (पुणे) प्रदेश अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा
4. श्री.गणेश भेगडे (पुणे) प्रदेश अध्यक्ष, किसान मोर्चा
5. मो.इद्रीस मुलतानी (छ.संभाजीनगर) प्रदेश अध्यक्ष, अल्पसंख्याक मोर्चा
6. श्री.विजय हरगुडे (पुणे) प्रदेश अध्यक्ष, कामगार आघाडी
7. श्री.राहुल केंद्रे (लातूर) प्रदेश अध्यक्ष, भटके विमुक्त आघाडी
8. श्री.गौरव पटवर्धन (नागपूर) प्रदेश संयोजक, परराष्ट्र संबंध विभाग
9. श्री.सुनिल कर्जतकर(मुंबई) प्रदेश संयोजक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
10. श्री.कृपाशंकर सिंह (मुंबई) प्रदेश संयोजक, विधानसभा विस्तारक योजना

 

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!