भाजपा पुणे लोकसभा निरीक्षकपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० मे २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणूक २०२४ चौथ्या टप्प्यात होणार्‍या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी माढ्याचे खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती भाजपा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली असून पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भाजपा पक्षातील जबाबदारी वाढली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीबद्दल खासदार रणजितसिंह यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!