सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मे पर्यंत अर्ज करा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.१० मे २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2019-20, 2020-21 आणि सन 2021-22 या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी व्यक्ती व संस्थांकडून 15 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री  कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रविण पुरस्कार यांची घोषणा करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार आणि संस्थांनी दि. 15 मे 2022 पूर्वी प्रस्ताव पाठवावेत.

व्यक्तिगत स्वरुपाच्या विविध पुरस्कारांसाठी पुरुषांसाठी किमान वयोमर्यादा 50 वर्षे तर महिलांसाठी किमान वय 40 आहे.  तसेच संस्थांगत पुरस्कारांसाठी संबंधित संस्था ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 व संस्था अधिनियम 1860 अंतर्गत असावी. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा  दूरध्वनी क्र. 02162-234246 येथे संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!