छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘अप्पी आमची कलेक्टर’मालिकेस शुभेच्छा कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । सातारा । “ सातारा जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून हजर झाल्यापासून मला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये मला कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी गडचिरोली,गोंदिया हिंगोली अशा भागात काम केले आहे. सगळे लोक कलेक्टर व्हायची इच्छा करतात पण इतर क्षेत्रे देखील महत्वाची असतात. त्या दृष्टीने देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. कलेक्टरसारखी चांगली सर्व्हिस दुनियात नाही. ही सेवा सोडून वर्ल्ड बँक मध्ये सेक्रेटरी पदावर काम करणाऱ्यानी देखील नंतर हीच सर्व्हिस चांगली वाटली असे सांगितले आहे. या सेवेत आव्हाने आहेत, कडवट समस्या निर्माण झाल्या की निराशा येते.मात्र ही नोकरी सोडून गेल्यानंतर वाईट वाटते. आपण इथे जेवढे काम करू शकतो तसे इतर नोकरीत असे काम नाही. सध्या मात्र कलेकटरची जबाबदारी वाढली आहे.मी मूळ दिल्लीचा आहे. मला आय.ए.एस होताना मुलाखतीत विचारले होते की तुम्ही कलेक्टरच होण्याचे कारण काय,बहुतांशी लोक मला समाजसेवा करण्याची इच्छा आहे, अशी उत्तरे देतात. याच मुलाखतीत लालबत्तीत बसण्याची इच्छा आहे म्हणूनच ना !’असे म्हटल्यावर मी होय म्हणालो होतो. पूर्वी या पोस्टचे महत्व अधिक होते. समाजात प्रतिष्ठा आदर होता. सायरन -पोलीस सभोवताली होते. देशासाठी काम करायचे होते हीच इच्छा होती. आज मात्र कळले तो काळ निघून गेला. १३ वर्षात खूप अनुभव घेतले. आज तुम्ही धाक दाखवायला गेला तर लोक तुमच्या अंगावर येतील. पूर्वीचे कलेक्टर आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ ,या मालिकेत कलेक्टर या मालिकेत कलेक्टरची भूमिका साकारणार आहेत. त्यामध्ये वास्तवाला धरून कथानक असेल असे मला वाटते. झी वर येणारे मजकूर हे प्रामाणिक असतात त्याच प्रमाणे ही मालिकासुद्धा प्रामाणिक आणि प्रेरणादायी असेल असे मत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.रुपेश जयवंशी यांनी व्यक्त केले ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेमध्ये इंग्रजी विभाग, महिला विकास मंच ,सांस्कृतिक विभाग यांनी संयुक्त रित्या आयोजित केलेल्या ‘झी मराठी कलाकारांशी थेट संवाद’ कार्यक्रमात, ’अप्पी आमची कलेक्टर ‘या मालिकेच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. झी मराठी व सबंधित कॉलेज मधील विभागाने २२ ऑगस्ट २०२२ रोजी झी वरून प्रसारित होणाऱ्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या प्रोमोच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे म्हणाल्या की’’ ही मालिका सोमवार ते शनिवार या काळात दररोज
संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होईल. स्नेहल धायगुडे आय.ए.एस झाली.तिची प्रेरणा देणारी कहाणी ऐकून अशी मालिका तयार करण्याचे मनात आले . गावात शिकलेली ही मुलगी शेतात काम करते आणि आय.ए.एस सुद्धा होते. समाजातील अनेकांच्या उपयोगी पडते. गावात राहून ,कष्ट करून आय.ए.एस होणे सोपे नसते पण ते करून दाखवले. त्यातूनच ‘अप्पी आमची कलेक्टर ही मालिका तयार झाली.झी मराठीने विषयाला समजून घेतले. झी मराठीला माझ्या भावना कळतात. या मालिकेत बहुतांशी सातारचे कलाकार आहेत आणि शुटींग देखील आसगाव येथे होत आहे. अप्पी म्हणजे अपर्णा हे पात्र आहे. शिवानी नाईक या औरंगाबाद येथील २३ वर्षीय मुलीने ही भूमिका
केली आहे. अहमदनगर करंडक स्पर्धेतील तिचा चांगला अभिनय बघून अप्पी या पात्रासाठी तिची निवड केली. कास्ट नंतर आता स्टार कास्ट होईल. कोविडच्या काळात कलेक्टर यांचे महत्व मला जाणवले.अपपी ला प्रचंड सपोर्ट तिचे आई वडील करतात.कुठेही राहणारी मुलगी काहीही मिळवू शकते हा संदेश यातून मिळतो’.लागीर झाले जी’ नंतर ही मालिका येत आहे.यश मिळवयचे असेल तर आपण कुठल्याही गोष्टीची कारणे देऊ नका,चिकाटीने काम करत राहा असा संदेश यातून जाईल.सातारयातील संतोष पाटील या कलाकाराचे त्यांनी यावेळी कौतुक केले.आणि टीम चांगली काम करत असल्याचे देखील सांगितले. अप्पीची भूमिका करणाऱ्या शिवानी नाईक हिने माझ्यासारख्या अभ्यासात हुशार नसलेल्या मुलाला कलेक्टर व्हायची संधी मिळते आहे.– कलेक्टर यांचे निरीक्षण करून मी हे पात्र चांगले करीन असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला. मी करत असलेली ही पहिलीच मालिका शूट सातारयात होणार आहे -टेकडी ,धुके ,गार वारे ,लोकेशन छान असून आसगाव सातारयाचा निसर्ग फ्रेश असल्याचे ती म्हणाली. संतोष पाटील यांनी सिक्स सीटर रिक्षावाला असलेल्या सुरेश मानेची म्हणजे अप्पिच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली आहे.त्यात बापू हे नाव असून प्रत्येक बापूला यातून प्रेरणा मिळेल,मनात जिद्द असेल तर यश मिळेल पण कुवत वाढवली पाहिजे असे त्यांनी सांगितले .विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सर्व कलाकार यांना प्रश्न विचारले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले., प्रारंभी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.रोशनआरा शेख यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्रा.गजानन चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक ,झी मराठीचे कलावंत ,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!