
दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । सातारा । राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (नविन क्र. 48) पुणे सातारा कि. 725.000 ( शेंद्रे-सातारा) ते 865..350 (देहू रोड जंक्शन) एकूण लांबी 140.35 कि.मी. हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्या कक्षेत येतो. या महामार्गालगत खालीलप्रमाणे अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
महामार्गाच्या हद्दीत काही ठिकाणी अस्तित्वात असलेल्या नाला, गटार (ड्रेन्स) अतिक्रमणांमुळे बंद करण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाण नाली बुजवून त्या ठिकाणी काँक्रिट, रस्ते केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होवू शकत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी येऊन डांबरीकरणाचे नुकसान होवू शकते. महामार्गालगत बांधण्यात आलेले नाले, गटारे हे केवळ रस्त्याच्या पृष्ठभागावरील पावासाचे पाणी वाहून नेण्यासाठी डिझाईन केलेले आहे. हायवेच्या दोन्ही बाजुच्या बऱ्याच व्यावसायिकांनी सांडपाणी रस्त्यावर सोडल्यामुळे वाहतुकीस अडचणी नर्माण होत आहेत. पाईप कर्ल्व्हटस (H.P.) मध्ये बऱ्याच ठिकाणी केबल्स, पाण्याच्या पाईल लाईन, विद्युत केबल्स क्रॉस केल्यामुळे पाईपमधून पाणी वाहू शकत नाही. तसेच काही ठिकाणी पाईपचे दोन्ही बाजून बंद करुन भराव केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.
तरी स्थानिक प्रशासन व जनतेनी वरील नमूद केलेली महामार्गावरील अतिक्रमणे आपणाकडून झाली असल्यास ती त्वरीत काढून घेवून वाहतुक सुरळीत होण्याच्या दृष्टिने सहकार्य करावे. अशी अतिक्रमणे काढली नसल्यास दि. 2 जून 2022 पासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या कार्यालयाकडून अतिक्रमणे काढण्याचे काम सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यावेळेस अतिक्रमणे काढताना आपले काही नुकसान झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.