पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । मुंबई । मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या अनुदान योजनेसाठी इच्छुक शाळांकडून दि. 7 ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या शाळांचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ७० टक्के व अपंग शाळामध्ये ५० टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक समुदायातील असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शासनाकडून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे.

स्वयंअर्थसहाय्यित शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!