
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । सातारा । जिल्हा परिषदेमार्फत 14 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात दलित, मागास स्त्रिया, उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक शैक्षणिक प्रबोधन करुन या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील एका संस्थेस 10 हजार रुपये व व्यक्तीस 7 हजार प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येणार आहे. संस्था व व्यक्तींनी आपले अर्ज 12 एप्रिल 2022 पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी केले आहे.
