
स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : फलटण-दहिवडी-सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची सध्याची रुंदी २० ते ३० मीटर असून, त्यातील १० मीटर भागाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, ते सध्याच्या रस्त्याच्या हद्दीतच होणार असल्याने अतिरिक्त जमीन अधिग्रहणाची आवश्यकता नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दळणवळण सुलभ होऊन आर्थिक विकासाला फायदा होईल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नावाने हे पत्रक असून, ‘दैनिक स्थैर्य’ने या पत्रकाच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही.
व्हायरल होत असलेल्या या पत्रकानुसार, महामार्गाचे काम पूर्ण वेगाने सुरू असून, नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रकल्पास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीबाबत गैरसमज पसरवले जात असून, ज्यांना शंका आहे, त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर मोजणीसाठी अर्ज करावा, असेही यात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, फलटण-दहिवडी-सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.