जिल्हा परिषद सेस अंतर्गत लाभासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा । सन 2022-23 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येणार आहेत.  इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून आपला मागणी अर्ज दि. 31 जुलै 2022 पर्यंत सादर करावा असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!