अंत्योदय अन्न योजन व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाराधारकांना आवाहन करण्यात येते की, रास्त भाव दुकानदार यांचेकडून आपणास नियमित अन्ना धान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 जिन्नसांचा समावेश असलेला 1 संच शासनाने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात मिळाला नसेल तर किंवा रास्त भाव दुकानदार यांनी शिधाजिन्नस संच वाटपामध्ये गैरप्रकार, अपहार केल्याची बाब निदर्शनास आली तर, आपली तक्रार तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे करावी. निश्चितच आपल्या तक्रारीची शहानिशा, चौकशी करुन संबंधितांवर कारवाई जाईल असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!