दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२४ | फलटण |
सांगवी, ता. फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपसरपंच श्री. शिवदास भगत यांनी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकसनशील कर्तृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज जाहीर प्रवेश केला.
यावेळी युवा नेते धनंजयदादा साळुंखे पाटील, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक जयकुमार शिंदे, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, श्री. नानासाहेब मोहिते, श्री. महादेव कदम, श्री. मच्छिन्द्र निकम, श्री. जावेदभाई शेख, श्री. सचिन वरपे, श्री. पृथ्वीराज मोहिते, श्री. शरद जगताप, श्री. अमोल लवळे-घाडगे, श्री. संग्राम सावंत, श्री. सुधीर घोलप, श्री. संजय गायकवाड, श्री. महेश लवळे-घाडगे, श्री. संदीप लवळे-घाडगे, श्री. किरण राऊत, श्री. सचिन भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.