स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: ऑक्सफोर्डच्या
कोरोना लशीपाठोपाठ भारतात ट्रायल सुरू असलेल्या रशियाच्या कोरोना लशीची
किंमतही जारी करण्यात आळी आहे. स्पुटनिक-व्ही लशीची किंमत जारी झाली आहे.
या लशीच्या एका डोसची किंमत १० डॉलरपेक्षाही कमी म्हणजे ७४० रुपयांपेक्षाही
कमी असेल.
मल्हारपेठेत आजारी बिबट्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशियाची लस
स्पुटनिक-व्ही अगदी कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. इतर कोरोना लशींपेक्षा
आपली लस स्वस्त असल्याचा दावा रशियानं केला आहे. या लशीचं इतर देशात
उत्पादन घेणा-या भागीदारांसह रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने
(आरडीईएफ) आपला करारही विस्तारीत केला आहे. २०२१ पर्यंत ५०० दशलक्षपेक्षा
अधिक लोकांसाठी लशीचं उत्पादन घेण्याचं उद्देश आहे. भारतातील डॉ. रेड्डीज
कंपनीनं रशियन लशीसाठी हाकरार केला आहे. भारतात या लशीचं दुस-या आणि तिस-या
टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.