पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर; १९ फेब्रुवारीला सातार्‍यात वितरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
यंदाच्या वर्षापासून सातारच्या राजघराण्याकडून व शिवभतांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘शिवसन्मान पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सातारा येथील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर शिवजयंतीदिनी प्रदान करण्यात येणार आहे.

खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी या नियोजित कार्यक्रमासाठी बुधवारी सैनिक स्कूलच्या जागेची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीसप्रमुख समीर शेख यांच्यासमवेत पाहणी केली.

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौर्‍याला राजशिष्टाचार कार्यालयाचा हिरवा कंदील मिळाल्यावर सातारा शहराला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!