
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली । नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



