दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । लोकशाहीर अण्णाभाऊ साठें यांची जयंती बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे प्रबुद्ध विद्याभवन येथे उत्साहात करण्यात आली. यावेळी ‘जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।’ हे काव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी सर्व विद्यार्थ्याना सांगून “आपण सुद्धा जग बदलण्यासाठी भरपूर अभ्यास करावा “असे विचार यावेळी व्यक्त केले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद अहिवळे यांनी दीप व अगरबत्ती प्रज्वलित करून अण्णाभाऊंना अभिवादन केले.या जयंती प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिवादनपर विचार व्यक्त केले.