
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । माण । पंचायत समिती माण यांच्या मार्फत दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल गणपत राऊत यांना माजी मंत्री व विधानपरीशदेचे आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी सदर प्रसंगी माजी सनदी अधिकारी व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माण पंचायत समितीच्या सभापती सौ. लतिका बबनशेठ वीरकर, माण पंचायत समितीच्या उपसभापती नितीन राजगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



