एंजल वनने दुस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । एंजल वन लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२२ रोजी समाप्त तिमाही व सहामाहीचे लेखापरीक्षणपूर्व (अन-ऑडिटेड) एकत्रित वित्तीय निकाल जाहीर केले आहेत. एंजल वनच्या ग्राहक संख्येत सातत्याने वाढ होत असून, आर्थिक वर्ष २३च्या दुसऱ्या तिमाहीत १.२ दशलक्ष नवीन ग्राहक कंपनीने संपादन केले, त्या जोरावर तिमाहीतील एकूण ग्राहक संख्येने ११ दशलक्षांचा टप्पा ओलांडला. आर्थिक वर्ष २३च्या पहिल्या तिमाहीत ६,८४५ दशलक्ष रुपयांवर असलेले कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ९.० टक्के वाढीसह आर्थिक वर्ष २३च्या दुसऱ्या तिमाहीत ७,४५९ दशलक्ष रुपयांवर गेले.

कंपनीचा एकत्रित ईबीडीएटी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २४९१ दशलक्ष रूपये होता जो दुस-या तिमाहीत २९२६ दशलक्ष रूपये झाला आहे. यात तिमाहीगणिक १७.५ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २३च्या दुसऱ्या तिमाहीत ईबीडीएटी मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या टक्केवारीत) ५२.४ टक्के राहिले. चालू कामकाजातून मिळणारा एकत्रित करोत्तर नफा (पीएटी) आर्थिक वर्ष२३च्या दुसऱ्या तिमाहीत २,१३६ दशलक्ष रुपये झाला आहे जो आर्थिक वर्ष२३च्या पहिल्या तिमाहीत १,८१६ दशलक्ष रुपये होता यात तिमाहीगणिक १७.७ टक्के वाढ झाली आहे. दुसरा हंगामी लाभांश म्हणून १० रुपये किमतीच्या प्रत्येक समभागासाठी ९.० रुपये लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे, हा लाभांश तिमाहीतील एकत्रित करोत्तर नफ्याच्या ३५ टक्क्यांशी समतुल्य आहे.

एंजल वनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले की, “आर्थिक वर्ष २३ची दुसरी तिमाही भारतीय भांडवली बाजारासाठी भक्कम कामगिरीची ठरली, कारण भारताने या काळात ६ दशलक्षांहून अधिक गुंतवणूकदार मिळवले आणि एकूण गुंतवणूकदारांची संख्या १०३ दशलक्षांवर नेली. इक्विटींमधील रिटेल सहभाग सातत्याने वेग घेत आहे. कारण या गुंतवणूकदारांना, पारंपरिक जोखीममुक्त व प्रत्यक्ष असेट्सच्या तुलनेत वित्तीय असेट्समध्ये गुंतवणूकीची बलस्थाने समजत आहेत. भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश कालांतराने नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू लागेल. कारण हे तरुणांचे समूह लवकरच त्यांच्या करिअर्समध्ये प्रगल्भ होतील आणि भविष्यकाळातील संपदा त्यांच्या हातात राहील.”

एंजल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर, म्हणाले की, “या तिमाहीत आम्ही भारतातील आजपर्यंत सेवा न मिळालेल्या भागांतून क्लाएंटस मिळवण्यात गुंतवणूक करणे कायम राखले. वाढीचा प्रमुख चालक घटक ठरलेल्या आमच्या डिजिटल धोरणामुळे आम्ही देशात उघडल्या गेलेल्या अतिरिक्त डिमॅट खात्यांत सुमारे १९ टक्क्यांचे योगदान देऊ शकलो. अशा रितीने आम्ही स्थिर वाढ साध्य करत, सप्टेंबर २०२२ मध्ये आमचा डिमॅट बाजारातील वाटा ११.३ टक्क्यांपर्यंत नेला. आमच्या वाढत्या क्लाएंटवर्गाने २३० दशलक्ष एकत्रित ऑर्डर्समार्फत १२.३ ट्रिलियन रुपयांचे दैनंदिन व्यवहार केले. त्यामुळे आम्ही सर्व निकषांवर आत्तापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी नोंदवू शकलो. तेजीच्या बाजारात आमचा रिटेल उलाढालीच्या बाजारातील वाटा वाढून २१.७ टक्के झाला. दमदार कार्यकारी व आर्थिक कामगिरीच्या जोडीने विस्तारत जाणाऱ्या बाजारातील वाट्यातून आमच्या व्यवसायाचा भक्कमपणा दिसून येतो.”


Back to top button
Don`t copy text!