एंजल ब्रोकिंगची एएमपीमध्ये एआय आधारीत चॅटबॉटची सुविधा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२६: एंजल ब्रोकिंगने अॅक्सलरेटेड मोबाइल पेजेस (एएमपी) मध्ये एआय आधारीत पूर्णपणे एकिकृत चॅटबॉट आणले असून अशी सुविधा देणारी ही पहिली बीएफएसआय कंपनी आहे. या नव्या सुविधेमुळे एंजल ब्रोकिंगच्या ग्राहकांना अधिक सुलभता व लवचिकता प्रदान केली जाईल. तसेच वेबसाइटवरील यूझर्सचा अनुभवही वृद्धींगत होईल. यासोबतच, ही सुविधा मोबाइल तसेच डेस्कटॉपद्वारेही मिळवता येईल. अॅक्सलरेटेड मोबाइल पेज किंवा एएमपी हा गूगलचा ओपन-सोर्स प्रोजेक्ट असून याद्वारे वेब पेजेस मोबाइलवरही योग्य रितीने कार्यरत होतात.

एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ आमच्या कंपनीत ग्राहकांच्या अनुभवाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. आम्ही ग्राहकांना सातत्याने सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करतो, प्रथम गुंतवणूक करणाऱ्यासाठी तसेच नियमित ट्रेडर्ससाठीदेखील हे खूप महत्त्वाचे ठरते. एएमपीमधील एएआय आधारीत चॅटबॉट हा या दृष्टीकोनाचा दाखला आहे. यामुळे ग्राहकांच्या एकंदरीत अनुभवात भर पडेल, अशी आम्हाला खात्री आहे. या इंटिग्रेशनमुळे आमचे मोबाइल वेब अॅप्लिकेशन अधिक संवादात्मक व आकर्षक बनेल.”

एंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, “ स्टॉक मार्केट हे प्रत्येकाला वापरता यावे, याकरिता एंजल ब्रोकिंगने मोबाइल-फर्स्ट दृष्टीकोन स्वीकारला आहे. देशभरातील रिटेल सहभाग वाढवावा, असा आमचा उद्देश आहे. विशेषत: निम-शहरी आणि ग्रामीण भागात, जिथे सु‌विधा नाहीत, त्या भागावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी ग्राहकांच्या अनुभवाबरोबरत गुंतवणुकदारांच्या शिक्षणाचीही मोठी भूमिका आहे. आम्ही एआय आधारीत चॅटबॉट हा एएमपीमध्ये जोडला असून याद्वारे दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील. नवनवीन सेवांची सुरुवात या क्षेत्रात करून आघाडी मिळवण्याची एंजल ब्रोकिंगची परंपरा या नव्या सुविधेद्वारे आम्ही अखंड सुरु ठेवली आहे.”

या सुविधेमुळे एएमपी पेजेस तत्काळ लोड होतात, वेगाने प्रतिसाद देतात तसेच पूर्वीपेक्षा वापरण्यास सोपे ठरतात. ते एचटीएमएल/सीएसएस आणि जावा स्क्रिप्टचा वापर मर्यादित करतात, यामुळे वेबच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात तसेच बीएफएसआय सेक्टरमध्ये एंजल ब्रोकिंग नेहमीच नूतनाविष्कारात आघाडीवर असते. या डिजिटल-फर्स्ट ब्रोकरने ‘ट्रेड इन १ आवर’ (आता ५ मिनिटापेतक्षा कमी वेळेत), इन्व्हेस्टमेंट इंजिन एआरक्यू (आता एआरक्यू प्राईम) आणि म्युच्युअल फंडसाठी युपीआय ऑटोपे इंटिग्रेशनसारख्या सुविधा सर्वप्रथम दिल्या. नव्याने दिलेल्या सुविधेद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या सामान्य गुंतवणुकीच्या शंकांचे निरसन होण्यास मदत मिळेल व याद्वारे त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता येईल. यामुळे त्यांना उत्कृष्ट यूझरचा अनुभव मिळेल.


Back to top button
Don`t copy text!