आणि ते विद्यार्थी भेटले बावीस वर्षांनी….

विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | बारामती |
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेमधील बॅच १९९९-२००० च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा २५ डिसेंबर रोजी विद्या प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी सौ. साठे संगीता, यादव प्रकाश, हिवरकर अर्जुन, रकटे नानासाहेब, घोरपडे अजिनाथ, कुंभार प्रकाश, मोहिते धनाजी, मोटे संदीप, शिंपी प्रमोद, राजेंद्र लोणकर, दत्तात्रय बबन आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

‘जरा विसावू या वळणावर’ या विषयाला अनुसरून कार्यक्रम संपन्न करत असताना शालेय जीवनातील सुखद व दुःखद घटना सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला व सध्या नोकरी, व्यवसाय करताना शालेय जीवनातील प्रत्येक अनुभव उपयोगी पडत असल्याने संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी व शिक्षक नाते दृढ करताना संस्कार व अभ्यास महत्वाचा असल्याचे सांगून सन २००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी नौकरी, उद्योग, व्यवसाय, खेळ व विविध क्षेत्रात शाळेचे नाव उज्ज्वल केल्याचे प्रा. प्रकाश यादव यांनी सांगितले.

शालेय जीवनातील आठवण सांगून शिस्त, संस्कारच्या शिदोरीमुळे जीवनात यश असल्याचे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. शिक्षकांनी सुद्धा सदर वर्गातील मुलांविषयी आपले विचार मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी होणे साठी अ‍ॅड. हरिष कुंभारकर यांच्यासह मेजर अनिल कायगुडे, वैशाली पवार, संतोष मोरे, सविता लोखंडे, शशिकांत चौधर, राणी मोकाशी, रमेश देवकाते, डॉ. विकास कुंभार, विशाल पवार या माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिले.

अ‍ॅड. हरिश कुंभरकर यांनी स्वागत केले. मनिषा काजळे व विनोद बनकर यांनी सूत्रसंचालन केले. किशोर खाडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!