
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । फलटण । सस्तेवाडी ता.फलटण येथे संदीप गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सेवक अहिवळे , संतोष पारसे आणि हनुमंत केंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत होलार समाजाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.
यावेळी होलार समाजावर होणारा वाढता अन्याय व अत्याचार, समाजाची शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या मागासलेपणा यावर गांभीर्याने विचार करायला हवा यासाठी तरुण वर्गाने एकत्र येऊन चळवळ हाती घेतली पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच सर्वांनी एकविचाराने एकदिलाने काम केले पाहिजे तरच होलार समाजाचे अस्तित्व सर्वमान्य होईल असे मत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी व्यक्त केले.
सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार नारायण आवटे यांनी मानले ओमकार अहिवळे पत्रकार निलकुमार गोरे, पत्रकार सुरज गोरे, महेश जाधव, प्रविण जाधव, विलास करे, महादेव जाधव, रुपेश अहिवळे, शशिकांत गेजगे, साहील जावीर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

