दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । श्री दत्त मंदिर संस्थान मोर्वे येथील शंकर दत्त महाराज व श्री सदगुरु चिले महाराज यांच्या कृपेने सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी श्री सदगुरु ज्ञानोबा हिंगमिरे देव यांचा ७५ वा अमृत महोत्सवी जन्मदिन अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाने संपन्न होणार असल्याची माहिती दत्त मंदिर संस्थान मोर्वे यांनी दिली आहे.
गेली ४३ वर्षे ज्याच्या पावन पदस्पर्शाने व अस्तित्वाने पावन झालेल्या कलीयुगातील पवित्र दत्तभूमी श्री दत्त मंदिर संस्थान मोर्वे येथील शंकर दत्त महाराज व श्री सदगुरु चिले महाराज यांच्या कृपेने सोमवार दि.२८ नोव्हेंबर रोजी श्री सदगुरु ज्ञानोबा विश्वनाथ हिंगमिरे देव यांचा ७५ वा अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
प. पू. देवांचा अमृत महोत्सवी सुखद वाटचाल शतकपूर्तीकडे अशीच चालत राहो हीच सदीच्छा ठेवून सर्व चिले भक्तांनी देवांच्या कृतार्थ जीवनाचा त्यांच्या अमृत महोत्सवाच्या कर्तव्य संपन्न वाटचालीचा सोहळा सर्व चिले भक्त व सर्व दत्त भक्तांच्या सोबतीने साजरा करण्याचे ठरवीले आहे. तरी या अविस्मरणीय सोहळ्याची गोडी आपल्या अगत्यपूर्ण उपस्थितीत अजून भक्तीमय होणार आहे तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे यासाठी आग्रहाचे निमंत्रण, दत्त मंदिर संस्थान मोर्वे यांनी दिले आहे.
परमपूज्य वंदनीय श्री सद्गुरु ज्ञानोबा विश्वनाथ हिंगमिरेदेव यांचा ७५ वा अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा निमित्त दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी विश्वनाथ शास्त्री आंध्र प्रदेश यांच्या पौरोहित्यखाली शतरुद्रीय महायज्ञ आरंभ होत असून दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी मोफत सर्व रोग निदान व मोफत औषध शिबिर व एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या तर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर व मोतीबिंदू लेन्ससहित बिगर टाक्याची मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.
त्याचप्रमाणे दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी परम पूज्य देवांचा जन्मदिन सोहळा ॐ काली श्री कालीचरण महाराज व श्री ष. ब्र.१०८ श्री महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या शुभाशीर्वचनाने व ॐ दत्त चले ॐ भजनी मंडळ मोर्वे यांचे भजन व परमपूज्य देवांचा जन्मदिन सोहळा दिमाखात साजरा होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दत्त मंदिर संस्थान मोर्वे यांनी दिली आहे.वरील सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचा लाभ सर्व भक्तांनी व नागरीकांनी लाभ घ्यावा.