प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध – आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि २७: सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रत्येक गावातील प्रश्न मार्गी लावून सर्वांगिण विकास साध्य केला आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

बेलावडे ता. जावली येथील बौद्धवस्ती येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून साकव पुलासाठी २७ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर झाला आणि या पुलाचे काम पूर्ण झाले. या पुलाचे उदघाटन आणि बौद्धवस्ती येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण (७ लाख रुपये) या कामाचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती जयदीप शिंदे, आरपीआयचे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, सरपंच वनिता रोकडे, उपसरपंच अजय शिंदे, नितीन शिंदे, बापूराव गायकवाड, किसनराव रोकडे, सुभाष शिंदे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष दशरथ कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

साकव पुलाचे काम मार्गी लागले असून आता बौद्ध वस्तीतील अंतर्गत रस्त्याचे कामही मार्गी लागले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथील स्मशानभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, संरक्षक भिंत आणि वेटिंग शेड हि कामेही लवकरच मार्गी लागतील असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला. या कामांचे तातडीने इस्टिमेट करण्याच्या सूचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, आर्डे, बेलावडे ते मेरुलिंग रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावू आणि गावातील उर्वरित सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!