स्थैर्य, कोळकी, दि. ६ : कोळकी गावात विकासाकामांचा डोंगर उभा करण्याबरोबरच ग्रामपंचायत अद्यावत बनवून कोळकी गावासाठी व ग्रामपंचायतीसाठी विविध मानांकने मिळणार असल्याचा निर्धार कोळकी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता सागर काकडे, सौ. वर्षा ज्ञानदेव शिंदे आणि गणेश दिनकर शिंदे यांनी केलेला आहे.
ग्रामंपचायतीची रणधुमाळी फलटण तालुक्यात सध्या सुरू झाली आहे. कोळकी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मतदारांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकीचा सर्वांगीण विकास गेली अनेक वर्षे होत आहे. कोळकी गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, बंदिस्त गटार योजना अशा महत्त्वकांक्षी योजना यशस्वी रित्या राबवण्याचा निर्धार सौ. प्राजक्ता सागर काकडे, सौ. वर्षा ज्ञानदेव शिंदे आणि गणेश दिनकर शिंदे यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणेे प्रभागातील लोकांच्या मुलभूत नागरी सुविधांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दक्ष असून वार्डात अंतर्गत रस्ते, डांबरीकरण व काँक्रिटीकरण, गार्डन विकसीत करणे, समाजमंदीर व मंदिराचा विकास अशा विविध विकासकामे राबवण्याचा ध्यास आहे. गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला विविध मानांकने मिळवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सौ. प्राजक्ता सागर काकडे, सौ. वर्षा ज्ञानदेव शिंदे आणि गणेश दिनकर शिंदे यांनी सांगितले.
विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आशिर्वाद व मार्गदर्शन, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा भक्कम पाठिंब्याच्या जोरावर कोळकी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन सौ. प्राजक्ता सागर काकडे, सौ. वर्षा ज्ञानदेव शिंदे आणि गणेश दिनकर शिंदे यांनी केलेले आहे.