अलका कुबल, प्राजक्ता गायकवाडांचा वाद उदयनराजेंच्या कोर्टात!


 


स्थैर्य, सातारा, दि.९ : काही संघटनांनी अभिनेत्री अलका कुबल यांनी
प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार रवी
सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे, अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ”माझी
आई काळुबाई” या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. या
पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज
उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. 

यावेळी चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड
यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर
मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत
मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली. अलका
कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर वाद सध्या
पेटलेला आहे. या प्रकरणात साताऱ्यासह राज्यातील काही संघटनांनी अलका कुबल
यांना धमकी देण्याचे प्रकार होत आहे. यामध्ये प्राजक्ता गायकवाड यांची
त्यांनी माफी मागावी. मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून
काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ”माझी आई काळुबाई” या
मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर
अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची
भेट घेऊन चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची वस्तुस्थिती नेमकी
काय होती ही मांडली. 

दोघींतील वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड
यांनी ही मालिका अर्ध्यातून सोडली आहे. यातूनच अलका कुबल आणि अभिनेत्री
प्राजक्ता गायकवाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उदयनराजे यांनी
अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता
गायकवाड यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. तसेच वादाबाबत चर्चा करुन हा
वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली. अलका कुबल यांच्या ”आई माझी
काळूबाई” या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरु होते. मात्र, मागच्या
महिन्यात या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर
गावकऱ्यांनी गावात चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील चित्रीकरण
मुंबईत करण्यात यावे, असे ठरले होते. म्हणून सगळे क्रू-मेंबर मुंबईला
परतले. विवेक आणि प्राजक्ताला एकाच गाडीने परतायचे होते. मात्र, विवेकला
उशीर झाल्याने प्राजक्ताने कारण विचारले. त्याने आपण कोव्हिड रुग्णांना
दाखल करून येत असल्याचे सांगितल्यावर ती थोडी घाबरली. मात्र, हे बोलून
दाखविल्यावर विवेकने मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले, असा
आरोप प्राजक्ताने केला आहे.

प्राजक्ताने मालिका का सोडली यांचे कारण सांगताना
अलका कुबल म्हणाल्या, सतत परीक्षेच्या नावाने सुट्ट्या घेते आणि कार्यक्रम
करते. यावर प्राजक्ताने आपली बाजू स्पष्ट केली आहे. ती म्हणते, मी
परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले होते. माझ्यामुळे कधीच चित्रीकरण
थांबलेले नाही. मी इव्हेंटची सुपारी घेते, असा आरोप झाला, त्यात तथ्य नाही.
कोरोनामुळे सध्या इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे हे कारण पटणारं नाही. तसेच
या मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध
होता. त्यानंतर मला चक्क रक्त लागलेली साडी दिली गेली. माझ्या आईने
त्याविषयी विचारले तर, त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटले जात आहे. 

प्राजक्ताने आपली बाजू मांडताना सांगितले की, मी एका
सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील आठ ते 10 तास काम करतात. तेव्हा
आमच्या घरात चूल पेटते. असे असतानाही मला आतापर्यंत मालिकेचा एकही रूपायाही
मिळालेला नाही. उलट मला बदनाम केले जाते आहे. मला या मालिकेचे आतापर्यंत
एकही दिवसाचे मानधन मिळालेले नाही. सध्या फक्त मालिका, चित्रपट किंवा वेब
सिरीजच करायच्या, असे काही मी ठरवलेले नाही. त्यामुळे यापुढे मला रंगभूमीवर
नाटकही करायला आवडेल. मी जे काही करेन ते समरस होऊन करेन, असे सांगत
प्राजक्ताने मी अजून राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार केलेला नाही.
मात्र, जे करेन ते मनापासून करेन, असे तिने स्पष्ट केले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!