घाडगेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह – ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्रीमंत बनेश्वर महादेव महाशिवरात्री उत्सव श्रीक्षेत्र घाडगेवाडी (वर्षे १९ वे) येथे शनिवार, दि. २ मार्च २०२४ ते शनिवार, दि. ९ मार्च २०२४ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ५ ते ७ काकड आरती व महापूजा सकाळी ८ ते १२, दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण वाचन, पारायण व्यासपीठ ह. भ. प. अनिल महाराज कुंभार (तडवळे) हे भूषवणार आहेत. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ६ ते ७ प्रवचन, रात्री ९ ते ११.३० कीर्तन सेवा, ११.३० ते २ जागर असे कार्यक्रम होणार आहेत.

शनिवार दि. २ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ७ ह.भ.प. अक्षय महाराज शिंदे यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११.३० ह.भ.प. सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांचे कीर्तन.

रविवार, दि. ३/३/२०२४ सायंकाळी ६ ते ७ ह.भ.प. विकास महाराज निंबाळकर यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११.३० ह.भ.प.भगवान महाराज चव्हाण (सोलापूर) यांचे कीर्तन व रात्री ११.३० ते २ जागर (हिंगणगाव).

सोमवार, दि. ४/३/२४ रोजी सायंकाळी ह.भ.प केशव महाराज जाधव यांचे प्रवचन, संध्याकाळी ९ ते ११.३० ह.भ.प. अजय महाराज खुस्पे (फलटण) यांचे कीर्तन व ९ ते ११.३० जागर (आळजापूर).

मंगळवार, दि. ५/३/२०२४ सायंकाळी ६ ते ७ प्रा. ह.भ.प. हिम्मत महाराज शिंदे यांचे प्रवचन व रात्री ९ ते ११.३० ह.भ.प. अविनाश महाराज नरूटे (अकलूज) यांचे कीर्तन, रात्री ११.३० ते २ जागर (बिबी).

बुधवार, दि. ६/३/२०२४ सायंकाळी ६ ते ७ विजय महाराज बोबडे यांचे प्रवचन, तर रात्री ९ ते ११.३० ह. भ.प. राजेंद्र महाराज मोरे (नातेपुते) यांचे कीर्तन, ११.३० ते २ जागर (शेरेवाडी).

गुरुवार, दि. ७/३/२०२४ रोजी सायंकाळी ६ ते ७ नितीन महाराज बुणगे यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११.३० किशोर महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन (लातूर), रात्री ११.३० ते २ जागर (मुळीकवाडी कोराळे).

शुक्रवार, दि. ८/२/२०२४ सायंकाळी ६ ते ७ ह. भ. प. पुष्पाताई कदम यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११.३० ह. भ. प. प्रवीण महाराज चव्हाण (बारामती) यांचे कीर्तन, रात्री ११.३० ते २ जागर (साखरवाडी भादे).

शनिवार, दि. ९/३/२०२४ रोजी सायंकाळी ६ ते ७ ह.भ.प. जाधव महाराज चोपदार यांचे प्रवचन, रात्री ९ ते ११.३० ह. भ. प. विश्वास आप्पा कोळकर (नांदल) यांचे कीर्तन होणार आहे.

शुक्रवार, दि. ८/३/२०२४ रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा जागर होईल. तसेच सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत महाफराळाचे सर्व भाविक भक्तांना वाटप होईल. तसेच दुपारी ३ ते ६ वाजता दिंडी सोहळा संपन्न होणार आहे.

शनिवार, दि. ९/३/२४ रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन होऊन उपस्थित भाविक भक्तांना श्री. दशरथ शामराव बोबडे (आबा) यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप होईल. या सप्ताहात विविध अन्नदाते अन्नदानाची सेवा करणार आहेत. सदर कार्यक्रमास फलटण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य राहील.

या सर्व कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन ग्रामस्थ घाडगेवाडी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!