राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर; सगळेच हसायला लागले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतलेली मुलाखत सध्या जोरदार गाजतेय. राजकीय वर्तुळात या मुलाखतीचे पडसाद पाहायला मिळत आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३ या सोहळ्यात ही महामुलाखत घेण्यात आली. त्यात अमृता फडणवीसांनी काही नेत्यांची नावे घेत तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. त्यात अजित पवारांचेही नाव होते.

अजित पवार यांना काय सल्ला द्या, तेव्हा राज ठाकरे यांनी मला अजित पवारांबाबत पाच तारखेच्या सभेत सविस्तर बोलायचेय. बाहेर जेवढे लक्ष देतायत त्यापेक्षा जास्त काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला राज यांनी दिला. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला. त्यावर अजित पवार एका वाक्यात उत्तर दिले तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला. अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवले तसे मीदेखील माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन असं प्रत्युत्तर अजितदादांनी दिले.

प्रसंग पाहून शरद पवारांनी भाकरी फिरवली
गेल्या ५५-६० वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवारांनी काही प्रसंग पाहून भाकरी फिरवण्याचे काम केलंय, नवे लोक पुढे आलेत आहेत हे सगळ्यांनी पाहिलेय, आम्हाला संधी मिळाली आम्ही काम दाखवून दिले. नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. नवे चेहरे आले पाहिजेत. पक्षातील पदाधिकारी असतात त्यात नवे चेहरे आले पाहिजेत. नवनवीन लोक पुढे येत असतात. काहीजण वयस्कर झाल्यावर बाजूला जातात. या घटना घडत राहतात असं अजित पवारांनी सांगितले आहे.

स्थानिकांशी चर्चा करून मार्ग काढा
बारसू प्रकल्पाबाबत अजित पवारांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या आड कधीही येणार नाही. विकास साधताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. लोकांच्या मनातील समज, गैरसमज असतील ते निकाली निघाले पाहिजे. स्थानिकांचे प्रश्न संवादाने सोडवायला हवे. सर्वेक्षण थांबवावे असं आवाहन आम्ही केले. स्थानिकांशी चर्चा करा. समृद्धी महामार्गालाही लोकांचा विरोध होता. पण चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर कुठे परिणाम होणार नसेल तर प्रकल्प करावा. लोकांना विश्वासात घेऊन करावे. संवेदनशीलपद्धतीने मार्ग काढावा असं आवाहन राज्य सरकारला केले. मी राजन साळवींचे विधान वाचले. त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. बेरोजगार, महागाई मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकल्पातून रोजगार मिळणे चांगली बाब आहे. परंतु पर्यावरणाचा विचार करायला हवं. उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली जनतेचा विरोध असेल तर त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. जनतेला विश्वासात घेऊन संवेदनशील मार्गाने हा प्रश्न निकाली काढावा असं त्यांनी म्हटलं.

गुन्हे मागे घेतलेत
बारसू येथे ज्या आंदोलकांना अटक झालीय त्यांच्याबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा झालीय. त्यात कायद्याच्या चौकटीत राहून हे गुन्हे मागे घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही गुन्हेही मागे घेतले आहेत. आणखी काही गुन्हे असतील तर मागे घेण्याचं निदर्शनास आणू असं अजित पवार म्हणाले.

भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लावू नका
मी कधीही माझे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावायला सांगितले नाही. जे लावतायेत त्यांनी बंद करा. अशाप्रकारे पोस्टर्स कुणी लावू नयेत. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल ते जनता बघेल. राजकीय पक्षही बघतील त्यानंतर काय ते ठरवतील असं सूचक विधानही अजित पवारांनी केले.


Back to top button
Don`t copy text!