अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पंढरपूर, दि.२१ : यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्याहस्ते सपत्निक होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती. निवडणूक आयोगाने नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मान्यता दिली आहे.

कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे
संचारबंदी लागू होणार असून 4 दिवस एसटी बससेवा देखील बंद राहणार असल्याचे
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा
वाढू लागल्याने प्रशासन गंभीर बनले आहे. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा
प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पंढपूरमध्ये 22 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून 26 नोव्हेंबर रात्री बारा
वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात
येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा 26 नोव्हेंबर रोजी होत असताना दशमीच्या
रात्री बारा वाजेपासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा
वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10
किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी
सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!