पेटीएम फाऊंडेशनने एअर क्वॉलिटी ऍक्शन फोरमची स्थापना केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । मुंबई । पेटीएम फाऊंडेशनने युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम (यूएनईपी) सोबतच्या सहयोगाने एअर क्वॉलिटी अॅक्शन फोरमची स्थापना केली आहे. हे फोरम भागधारकांच्या सल्ल्याच्या माध्यमातून भारतातील वायू प्रदूषणाच्या परिणामाचे निर्मलून करण्‍यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांना दाखवेल.

एका सल्लागार बैठकीला संबोधित करताना पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, “भारतातील वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हे फोरम कॉर्पोरेट चॅम्पियन्स निर्माण करण्याच्या दिशेने काम करेल. हवेच्या गुणवत्तेचे मीटर हे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेचा भाग बनले पाहिजेत.’’

ते पुढे म्हणाले, “स्वच्छ भारत मिशन’चा भाग म्हणून वायू प्रदूषणाच्या पातळीच्या आधारावर राज्य आणि शहरांची क्रमवारी लावण्यासाठी स्वच्छ हवा उपक्रम राबवण्याची गरज आहे.”

एक्यूएएएफच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने सर्व सहा भागधारकांमध्ये सल्लामसलत बैठका आयोजित केल्या गेल्या, ज्याचा उद्देश भारतातील वायू प्रदूषणाशी संबंधित विविध मुद्दयांवर प्रत्येकाची मते ओळखणे आणि ते कमी करण्यासाठी संभाव्य उपाय शोधणे हा होता.

सल्लामसलत बैठकींमधून मिळालेले काही उपाय पुढीलप्रमाणे:

  1. नाविन्यपूर्ण उपाययोजना व उत्पादनांसाठी इकोसिस्टिम निर्माण करण्याची गरज
  2. स्थानिक उपायांची परिणामकारकता आणि मापनक्षमता समजून घेण्यासाठी प्रायोगिक अभ्यास/प्रकल्पांना प्रोत्साहन देणे
  3. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आणि हवेच्या गुणवत्ता मापन मापदंडांच्या मानकीकरणासाठी सध्याच्या आराखड्यामध्ये आरोग्याच्या पैलूंचा समावेश

या चर्चांमधील अभिप्राय व सूचनांमधून आव्हाने, तफावत, गरजा व समन्वय साधून उपाय हे समजण्याकरिता अहवालाचा मसुदा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल लवकरच मंचाच्या अधिवेशनात प्रसिद्ध केला जाईल. आयआयटी-डी मधील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिसर्च इन क्लायमेट चेंज (सीईआरसीए)ला अंमलबजावणी भागीदार म्हणून निवडण्यात आले आहे. इतर अनेक सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्था आणि डीटीयूसारख्या सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला आणि सल्लामसलत बैठकांच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.

सल्लामसलत करताना राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्र व आसपासच्या भागांमधील हवा गुणवत्ता व्‍यवस्थापन आयोगाचे सदस्‍य सचिव श्री. अरविंद नौटियाल, एमओईईएफसीसीचे सह-संचालक श्री. सुधीर चिंतलपती, आणि सीपीसीबीचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत गर्गवा यांनी देखील वायू प्रदूषणाचे निर्मूलन करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये उपयुक्त माहिती दिली.

विजय शेखर शर्मा यांना स्वच्छ हवेसाठी यूएनचे पर्यावरण संरक्षक म्हणून नाव देण्यात आले आहे. हा उपक्रम सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूकता निर्माण करत आणि सहयोगी भागीदारीद्वारे त्यांचे निराकरण करत यूएन एन्व्हायरमेंटच्या जागतिक ब्रीदलाइफ मोहिमेचे समर्थन करण्याप्रती असलेल्या पेटीएमच्या कटिबद्धतेचा एक भाग आहे.


Back to top button
Don`t copy text!