स्थैर्य, दि.१७: तोट्यात जाणाऱ्या एअर
इंडियाने ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर 50% सूट जाहीर केली आहे. 60 वर्ष
किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सूट मिळेल. बुधवारी विमान
वाहतूक मंत्रालयाने या योजनेची माहिती दिली. यासाठी काही अटी देखील
ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रवासाच्या दिवसाच्या किमान 7 दिवस आधी
तिकिट बुकिंग आवश्यक आहे.
ही
योजना देशांतर्गत उड्डाणांसाठी आहे. चेक इन करताना व्हॅलिड आयडी दाखवला
गेला नाही तर बेसिक भाडे जप्त केले जाईल आणि पैसे परत मिळणार नाहीत. या
योजनेची संपूर्ण माहिती एअर इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
- प्रवास करणारा भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय 60 वर्ष पूर्ण असावे.
- एक वैध फोटो आयडी असणे आवश्यक आहे. ज्यात जन्मतारीख आहे.
- इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग कॅटेगरीसाठी मूळ भाडेच्या 50 टक्के भाडे द्यावे लागेल.
- ही ऑफर भारतातील कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी वैध असेल.
- ही ऑफर तिकीट जारी करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असेल.
- एअर इंडियाकडून अशी स्कीम यापूर्वीही चावली जात होती, आता सरकारने याची मंजूरी दिली आहे.
एअरलाइनवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज
तोट्यात
जाणाऱ्या एअर इंडियावर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. सरकारला हे
विक्रीस काढायचे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यासाठी बोली मागितल्या
गेल्या होत्या.