दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कृषी क्षेत्रात अग्रेसर असणार्या के बी उद्योग समूहाचे डायरेक्टर सचिन यादव नेहमीच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांची दखल घेत असतात. नुकताच महाराष्ट्र शासनाचा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ फलटण तालुक्यातील गिरवी गावचे सुपुत्र रामदास कदम यांना जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा सातारा जिल्ह्यातील पहिला ‘कृषी सेवारत्न पुरस्कार’ फलटणचे सुपुत्र कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार मिळाल्याबद्दल के बी उद्योग समूहाच्या वतीने डायरेक्टर सचिन यादव यांनी शाल व बुके देऊन दोन्ही दिग्गजांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांचा जीवन प्रवास सर्वांसमोर मांडला. के बी कंपनीतर्फे प्रत्येक कार्यात नेहमी सहकार्य राहिले आहे, याचा आवर्जून उल्लेख करून डायरेक्टर सचिन यादव यांचे आभार मानले.
सचिन यादव यांनी समारोपावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना भविष्यात असेच उल्लेखनीय कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.