श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘मराठी गौरव दिन’ व ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे आज ‘मराठी गौरव दिन’ व ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. प्रभाकर पवार सर (मराठी विभाग प्रमुख मुधोजी कॉलेज फलटण), आ. मा. प्रा. सुधीर इंगळे सर (पर्यावरण प्रेमी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते), आ. डॉ. सागर निंबाळकर (प्राचार्य श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ फलटण), आ. डॉ. चंद्रकांत दिनकर पाटील सर (फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि स्कूल कमिटी सदस्य) आणि आ. सौ. संध्या फाळके (प्राचार्या, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडयम स्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण) आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक सौ. अनुराधा रणवरे (शिक्षिका) यांनी केले आणि कवी कुसुमाग्रज व सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.खराडे मॅडम व कुंभार मॅडम यांनी करून दिला. यानंतर प्रा. संध्या फाळके यांच्या हस्ते पाहुण्यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी इयत्ता सहावीमधील सिद्धी इत्राज आणि सिद्धी निकम या विद्यार्थिनींनी ‘मराठी भाषा दिन’ या विषयी भाषण सादर केले आणि इयत्ता पाचवीमधील जोया काझी आणि इयत्ता सहावीमधील अनुष्का निंबाळकर या विद्यार्थिनींनी ‘विज्ञान दिन’ या विषयी आपले भाषण सादर केले. तसेच इयत्ता सातवीमधील समर्था कांबळे, समृद्धी कुंभार, जान्हवी चोरमले, तनुष्का जगताप या विद्यार्थिनींनी मराठी दिनानिमित्त समूहगीत सादर केले. यानंतर मराठी भाषा समृद्ध कशी करावी व तिचे संवर्धन कसे केले पाहिजे, याविषयी डॉ. प्रभाकर पवार सर यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.

अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी मा. प्रा. सुधीर इंगळे सर यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवून बुवाबाजी करणार्‍या लोकांपुढे कुणीही बळी पडू नये असा संदेश दिला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कोकरे आणि शिवांजली भगत या विद्यार्थिनींनी केले आणि कार्यक्रमांचे आभार अविनाश पवार सर यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.


Back to top button
Don`t copy text!