कृषी कन्यांनी केला जागतिक रक्तदाता दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 15 जून 2025 । येथील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प 2025-2026 कार्यक्रमांतर्गत जागतिक रक्तदाता दिन साजरा केला.

14 जून हा दिवस डॉक्टर कार्ल लँड स्टायनर यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी रक्तगटाचा शोध लावली होता. त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाली त्यांच्या योगदानाच्या सन्मानात हा दिवस साजरा केला जातो. जीव वाचवण्यासाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक रुग्ण अपघात ग्रस्त स्त्रियांना प्रसूतीदरम्यान कॅन्सर व निमिया रुग्णांना रक्ताची गरज असते. एक रक्तदाता तिघांचा जीव वाचवू शकतो. रक्तदानाचे अनेक फायदे आहेत जसे की शरीरातील अतिरिक्त लोह कमी होते. नवीन रक्तपेशी निर्माण होतात. हृदयाचे आरोग्य सुधारते. समाजात एक सकारात्मक संदेश जातो.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तुमच्या एका रक्तदामुळे कोणाचे तरी आयुष्य वाचू शकतं, ‘चला आजच रक्तदान करूया ’असा संदेश कृषी करण्यांनी ग्रामस्थांना दिला.

या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणेकर वैष्णवी ,देवकर वैष्णवी,मांजरे प्रीती , कारखेले वैष्णवी, शेख मुस्कान , निकम श्वेता, कुटे कल्याणी यांनी उत्कृष्ट पद्धतीनं रक्तदानाची माहिती दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!