दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. शेतकर्यांसमवेत विविध विषयांवर प्रात्यक्षिक देत असताना बागायती पिकांसाठी खड्डे खोदणे आणि भरणे याचे प्रात्यक्षिक दिले. प्रात्यक्षिक घेत असताना गावातील शेतकर्यांना शास्त्रीय पद्धतीने बागायती पिकांसाठी खड्डे खोदणे आणि भरणे याचे महत्त्व या कृषीदूतांनी सांगितले.
पाडेगाव येथे श्री. भगवान महादेव माने यांच्या शेतात त्यांनी आंब्याचे रोप लावून योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले. यामधून होणारे फायदे व माहिती सांगितली. सर्व शेतकर्यांनी शेतात या पध्दतीने लागवड करावी, असा सल्ला कृषिदूतांनी दिला.
मुळांच्या भागात बुरशीचे आक्रमण कमी करणे, फळबागेत योग्य अंतर राखणे, शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे, असे कृषिदूतांनी शेतकर्यांना सांगितले.
यावेळी ग्रामस्थ सचिन सोनलकर, दत्तात्रय धायगुडे, पियूष पांडुळे, बाळासाहेब माने, रमेश धायगुडे, सुहास माने, हरिश्चंद्र माने,भगवान माने आदी शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत इंगोले धनंजय, केसकर राहुल, कांबळे रोहन, काटकर सौरभ, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत गोडसे आदित्य यांनी प्रात्यक्षिक पार पाडले.