कृषीदूतांनी शेतकर्‍यांना दाखविले जैविक खत प्रात्यक्षिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२४ | दापोली |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाच्या ‘निसर्गमित्र गटा’ने कोशिंबळे या गावात भाताच्या रोपांना लागवडीकरिता ‘बायोला जैविक खत’ या संमिश्र खताचा (३० मिनिटे) भाताचे रोप बुडवून त्यानंतर लागवड कशा पद्धतीने करायची ते प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्षात शेतात भाताच्या रोपांची लागवड करून माहिती दिली. यास कोशिंबळे परिसरातील शेतकर्‍यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यासाठी केंद्रप्रमुख डॉ. मनोज तलाठी व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी श्री. जीवन आरेकर, विषयतज्ज्ञ डॉ. राजेंद्र भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन गोडसे, सौरभ शेडगे, सुमेध वाकळे, अनिश जगताप, अनिकेत काजरेकर, आकाश जाधव, लक्ष्मण माळगी, वैभव फुलसुंदर, पार्थ गुरसळे, प्रतिक चव्हाण, रिषभ मोरे यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!