मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन


स्थैर्य,मुंबई, दि.७: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. दरम्यान ही धमकी कशासाठी आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर अभिनेत्री कंगना रनौट प्रकरणी भाष्य केल्याने गृहमंत्र्यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना काल हा फोन आल्याचे समजते आहे. मात्र हा फोन भारतातून आल्याची माहिती आहे. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे

दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आले आणि मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली होती. दरम्यान, मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यानंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे कॉल आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!