दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । बारामती । रविवार 12 जून रोजी बारामती शहरातील अंबिका नगर येथील रहिवासी ऍड. सर्वदमन प्रतापराव राजे निंबाळकर (वय वर्ष 70) यांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले.
राज्याच्या न्याय व विधी खात्यात मुबई येथे त्यांनी मुख्य सरकारी अभियोक्ता म्हणून सेवा केली होती सेवा निवृत्त्ती नंतर बारामती मध्ये स्थायिक झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार असून प्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉ. अजिंक्य राजे निंबाळकर यांचे ते वडील होत.
मंगळवार दि. 14 जून रोजी चांदशावली दर्गा शेजारील स्म्शान भूमी मध्ये सावडण्याचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता होणार आहे