अ‍ॅड. कांचनकन्होजाताई खरात यांना दीपस्तंभ नारी पुरस्कार

सातार्‍यातील ध्यास फाऊंडेशनकडून नऊ महिलांचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 17 मार्च 2025। फलटण । जागतिक महिला दिनाच्यानिमित्त सातारा येथील ध्यास फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या नऊ महिलांना दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव येथे करण्यात आला.

या पुरस्कारासाठी अ‍ॅड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात (फलटण) यांच्यासह डॉ. शुभांगी गायकवाड (सातारा), श्रीमती शैला वसंत यादव (औंध), सौ. कुमुदिनी जगदीश पांढरे (सासवड), सौ. विमल चिंतामणराव मुंडे (रायगड), डॉ. नीलम दिलीप शिंदे (सांगली), सौ. हेमलता किसन फडतरे (खटाव), अ‍ॅड. सुचित्रा काटकर (सातारा) यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंत शिंदे, न्यूट्रिशन अमेय भागवत, संतोष कदम  आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन तारळकर यांनी खेळाचे महत्व व स्त्री विकास याचे महत्त्व सांगितले. वसंत शिंदे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगूून महिलांविषयी कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदन करुन झाले.

ध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. वैजयंती ओतारी यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर सरिता नाईक, सौ.सुप्रिया जाधव व सौ.धनश्री जगताप यांनी सत्कार केला. अ‍ॅड. सुरेश रुपनवर यांनी आभार मानले. सौ.पद्मा ओतारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमिला जाधव या अंधभगिनीने मान्यवरा व पुरस्कार विजेत्या भगिनींना खत निर्मितीची बास्केट दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!