दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । मुंबई । भारतातील झपाट्याने विकसित होणारी एडटेक कंपनी इन्फिनिटी लर्नची स्थापना केलेला आशियातील सर्वात मोठा शैक्षणिक समूह श्री चैतन्यला जाहीर करताना अभिमान वाटतो की, कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेशन’ मिळाले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार इन्फिनिटी लर्नमधील कर्मचा-यांनी सांगितलेल्या काम करण्याच्या अनुभवाच्या आधारावर आहे आणि कंपनीला असा सन्मान मिळवून देणारा सर्वात नवीन के१२ एडटेक ब्रॅण्ड बनवतो.
इन्फिनिटी लर्न विश्वास, अभिमान व कार्यपद्धती या गुणांवर मापन करण्यात आलेल्या ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून कंपन्यांच्या प्रख्यात यादीमध्ये सामील झाली आहे. हे प्रमाणन इन्फिनिटी लर्नच्या वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक व कर्मचारी-केंद्रित कार्यपद्धती निर्माण करण्याप्रती कटिबद्धतेला सन्मानित करते.
टीम सदस्यांनी ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेशनला माहिती देण्यास मदत करण्यासाठी स्वतंत्रपणे सर्वेक्षण करत योगदान दिले आणि ७६ टक्के कर्मचा-यांनी सांगितले आहे की इन्फिनिटी लर्न हे काम करण्यासाठी उत्तम स्थळ आहे. सर्वेक्षणामधून कंपनीच्या समुदायाप्रती योगदानासंदर्भात सकारात्मक भावना, इन्फिनिटी लर्नमधील अभिमानास्पद भावना आणि लोक-केंद्रित असण्याची क्षमता दिसून येते.
ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेशन जगभरातील कर्मचारी व नियोक्तांना सन्मानित करते आणि उल्लेखनीय कर्मचारी अनुभव ओळखून त्यांना सन्मानित करण्यासाठी जागतिक बेंचमार्क आहे.
इन्फिनिटी लर्न बाय श्री चैतन्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष उज्वल सिंग म्हणाले, “ब-याचदा कर्मचा-यांना इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा ते किती आऊटपुट देऊ शकतात यासाठी अधिक महत्त्व दिले जाते. पण आम्हाला आमच्या कर्मचा-यांना प्राधान्य देण्याचा अभिमान वाटतो. मी इन्फिनिटी लर्नला ग्रेट प्लेस टू वर्क’चा सन्मान मिळवून देण्यासाठी माझ्या सर्व सहका-यांचे आभार मानतो. ‘पॉवरिंग लर्नर सक्सेस’ (आणि मुलांच्या शिक्षणाची खात्री) या आमच्या उद्देशाप्रती त्यांचा संकल्प व अतूट विशसामुळे हे यश शक्य झाले. आम्ही सर्व प्रकाराच्या कामामध्ये ‘थिंक लाइक अॅन ओनर’ तत्त्वाचा अवलंब करतो आणि त्यांना महत्त्व देण्यासोबत त्यांचा आदर करतो. हाय-ट्रस्ट, हाय-परफॉर्मन्स कल्चरप्रती मनसुबा स्थिर व्यवसाय निष्पत्ती देण्यामध्ये मदत करतो आणि प्रत्येक कर्मचा-याला उत्तम कार्यस्थळाचा भाग बनवतो. म्हणून, ते सर्व ‘पॉवरिंग लर्नर्स प्रोग्रेस’ दृष्टीकोनाप्रती आणि इन्फिनिटी लर्न बाय श्री चैतन्यला ‘ए ग्रेट प्लेस टू वर्क फॉर ऑल’ बनवण्याप्रती समर्पित आहेत.”