पंढरीतील बुध्दभूमीवर बुद्ध जयंती संपन्न – रमाईच्या माहेरी भेट देणाऱ्या लेकींचा केला सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । पंढरपूर । बुद्धजयंती निमित्त पंढरपूरतील बुद्धभूमीवर बोधिवृक्षाचे पूजन करून तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमाचे पूजन ऍड प्रमोद सावंत तसेच मिटकॉनचे पंढरपूर होली सिटी समनव्यक श्री अरविंद दोरवट ,युवा नेते उमेश सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी रामाईच्या माहेरी भेट देणाऱ्या पंढरपूरतील रमाईंच्या लेकींचा सन्मान सम्यक क्रांती मंचच्या वतीने सौ. सुजाता लोंढे आणि सौ. शीतल आठवले यांच्या हस्ते शाल व पुष्प देऊन करण्यात आला. या कार्यक्रमास सम्यक क्रांती मंच संस्थापक सिद्धार्थ जाधव प्रदेश अध्यक्ष प्रशांत लोंढे, सचिव स्वप्नील गायकवाड , राजन गायकवाड , इंजिनिअर निलेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!