स्थैर्य, कोपर्डे हवेली, दि.२६: येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुपे दिली जातात. गुरुवारी श्री सिध्दनाथ घोड्यावर, तर माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार झालेली पूजा बांधण्यात आली होती. दरम्यान, ही आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोषाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व युवक मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. दरम्यान, मंदिर परिसरात रांगोळी घालण्यात येते, तर मंदिर फुलांनी सजवले जाते.
एक लाख कोटी डॉलरच्या बाजारावर ताबा मिळवण्यासाठी अंबानी-बेझोस यांच्यात लढाई