दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे ‘कॉम्प्युटर अॅण्ड मॅनेजमेंट’ विभागांतर्गत सुरू असलेल्या ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन’ (बी.सी.ए.) या अभ्यासक्रमाच्या जलदगती अतिरिक्त तुकडीस शासन व विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बी.सी.ए. भाग – १ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. १ सप्टेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश त्वरित निश्चित करावेत, असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘कॉम्प्युटर अॅण्ड मॅनेजमेंट’ विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण मोबा. ९९२२०११००१, ९४२१९६३७०४, ८६६८७४५०४३ येथे संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.