सह्याद्री अतिथीगृहात फॉल सिलिंग कोसळल्यासंदर्भात राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आढावा बैठक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि.०८:  सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतेच फॉल सिलिंग कोसळले त्यासंदर्भात राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढील कार्यवाही संदर्भात आढावा घेतला. नियमित संरचनात्मक लेखापरिक्षणात फॉल सिलिंगचा समावेश करण्यात यावा. राज्यातील सर्व शासकिय अतिथीगृहाचा यात समावेश करण्यात यावा. याचबरोबर नियमित ऑडीट व देखभाल करण्यात यावी, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात नुकतेच फॉल सिलिंग कोसळले त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, बांधकाम विभागाचे सहसचिव श्री गायकवाड उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!