दिवाळी निमित्त ठाणे, सोलापूरसह राज्यभरात साता-याहून एसटीच्या जादा गाड्या


 

स्थैर्य, सातारा, दि.४ : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून वाहतूक ठप्प होती. मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या एसटी स्थानकांवर दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या कालावधीत राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटीच्या सातारा विभागाच्या वतीने जादा 90 फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली एसटी सेवा गेल्या महिन्यात सुरू झाली. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. मात्र, आता प्रवाशांची संख्या वाढल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. एसटी विभागाने दिवाळीनिमित्त उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्‍वर, मेढा, खंडाळा, वडूज या 11 स्थानकांमधून नियमित फेऱ्या व्यतिरिक्त 90 फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर, लातूर, महाड व राज्यभरातील इतर ठिकाणी जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे.

प्रवाशांची संख्या वाढल्याने गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जाणाऱ्या एसटी फेऱ्याची संख्या पूर्वीप्रमाणे केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!