टीसीएलची आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह


 

स्थैर्य, मुंबई, दि.४:जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता
आणि अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स कंपनी टीसीएलने कंपनीच्या यूआय टीसीएल चॅनेलवर कंटेंट
पॅकेजवर ५० टक्के सवलत देण्याच्या उद्देशाने भारतातील टॉप ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी
केली आहे. याअंतर्गत इरॉस नाऊच्या वार्षिक पॅकवर ५० टक्के, झी फाइव्हच्या सर्व पॅकवर
२५ टक्के , डॉक्युबेच्या हंगामी आणि वार्षिक पॅकवर ४० टक्के, एपिक ऑनच्या सर्व पॅकवर
२५ टक्के, सोनीलिव्हच्या वार्षिक पॅकवर १० टक्के सवलत देण्यात आली असून हंगामा प्लेसाठी
३ महिने फ्री ट्रायल देण्यात आले आहे. ही विशेष सवलत ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत सुरू
असेल. ग्राहकांना टीसीएल अँड्रॉइड टीव्हीच्या टीसीएल चॅनलवर ग्राहकांना या सर्व ऑफर्स
मिळतील.

टीसीएल
इंडियाचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विजय मिक्किलीनेनी
म्हणाले, “सणासुदीचा हंगाम हा केवळ उत्पादन विक्रीसाठी नव्हे तर ग्राहकांप्रती कृतज्ञता
व्यक्त करण्याचादेखील काळ आहे. आम्ही उत्कृष्ट तंत्रज्ञान प्रदान करण्यावर विश्वास
ठेवतोच, पण त्यासोबतच, कंटेंट प्लॅटफॉर्मचे महत्त्वही जाणतो. त्यामुळेच यंदाच्या सणासुदीत
आम्ही ही भेटवस्तू आणली आहे. आमचा अँड्रॉइड टीव्ही सुरु केल्यावर ग्राहकांना प्रत्येक
क्षणाचा आनंद घेता यावा, याची हमी आम्हाला घ्यायची आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!