कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । पुणे । जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली.

यावेळी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि  एकाच वेळी मोठी गर्दी होणार नाही अशा प्रकारे दर्शन रांगांचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!