दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२४ | फलटण |
व्यसन हा सध्या तरुणाईसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. तो सुटण्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाने काम करणे गरजेचे आहे, असे श्रीमंत मलठणचा राजा गणेशोत्सव मंडळ फलटणचे शुभम थोरात यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आपले विचार मांडले आहेत.
थोरात म्हणाले की, ‘गणेशोत्सव’ हा सज्जन शक्ती आणि सामाजिक एकता यांचा सुरेख संगम आहे. यामाध्यमातून अनेक आपत्तीमध्ये तसेच गरजेच्या वेळी समाजासाठी २४ तास कार्यकर्ते उपलब्ध होतात.काही अपवाद वगळता ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक समस्या आणि अमलीपदार्थ विक्री याबाबत सातारा पोलिस आणि प्रिंट मीडिया यांनी गणेश मंडळे आणि विविध सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन कार्य करण्याची गरज आहे. शहरातील मंडळांनी विसर्जन मिरवणुकादरम्यान स्पीकरच्या मोठ्या भिंती, लेझर लाइट आदी टाळून पारंपरिक पध्दतीने विसर्जन मिरवणुका पार पाडण्यावर मंडळांनी भर दिल्यास गणेशोत्सवाला पुर्नवैभव प्राप्त होईल.