दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणमधील श्री. पार्थ संताजी कदम या तरुण युवकाने मिलेनियम नॅशनल स्कूल, पुणे येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमधील पेन्सिलेविनिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून ‘बॅचलर इन फॉरेन्सिक सायन्स बायोलॉजी’ ही पदवी संपादन केली. सातारा जिल्हा बार असोसिएशन, सातारा या वकिलांच्या बार असोसिएशनने पार्थ कदम यांची शैक्षणिक भरारीची दखल घेऊन त्याचा सत्कार समारंभ व तसेच त्याचे ‘फॉरेन्सिक सायन्स इन क्राईम इनविस्टीगेशन’ या विषयावरती मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरामध्ये ‘फॉरेन्सिक सायन्स आणि एविडेन्स प्रोसिजर’ यावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेमधे प्रामुख्याने डीएनए, हेअर, ब्लड, टूलमार्क्स, फायर आर्मस आणि फिंगर प्रिंट याविषयीचे विश्लेषण आणि ‘एविडेन्स कलेक्शन’ कसे व कोणत्या प्रकारे करावयाचे, याबद्दल माहिती देण्यात आली.
भारत आणि अमेरिकेमध्ये पुरावे गोळा करण्याचे व तपासण्याचे आधुनिक व परंपरागत पद्धतीबद्दल उपस्थित वकिलांनी केलेल्या प्रश्नोत्तरांमधून ‘फॉरेन्सिक सायन्स’ या विषयाची सर्वांना सखोल माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने पार्थ कदम यांनी कार्यक्रमास उपस्थितीत राहून दिलेल्या माहितीबद्दल त्याचे आभार मानले आणि त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.