दैनिक स्थैर्य | दि. २५ मे २०२४ | फलटण |
गेल्या १५ दिवसांत फलटण तालुक्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला असून आजपर्यंत तालुक्यात सरासरी एकूण ४२.३ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस मे महिन्याच्या सरासरी पाऊसापेक्षा १७४ % जादा आहे. हा पाऊस पाच दिवस पडला.
दरम्यान, फलटण तालुक्यातील आदर्की सर्कलमध्ये सर्वात जास्त पाऊस झाला असून ९९.५ मिमी म्हणजे ४०९ टक्के पाऊस पडला आहे.
तालुक्यातील सर्कलनुसार पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (कंसात टक्केवारी) खालीलप्रमाणे…
- फलटण – ५१.० (२०९.९)
- आसू – २३.२ (९५.५)
- होळ – २८.९ (११८.९)
- गिरवी – ५८.३ (२३९.९)
- आदर्की – ९९.५ (४०९.५)
- वाठार – ३७.३ (१५३.५)
- बरड – १७.७ (७२.८)
- राजाळे – २४.२ (९९.६)
- तरडगाव – ४०.५ (१६६.७)