अभिनेता फराझ खानचे निधन


 

स्थैर्य, मुंबई, दि.४: बॉलिवूडसाठी 2020 हे
वर्ष अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक राहिले आहे. इंडस्ट्रीमधून आणखी एक
दु:खद बातमी समोर येते आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीचा सिनेमा
‘मेंहंदी’मध्ये काम केलेला अभिनेता फराझ खान याचे वयाच्या ४६ व्या वर्षी
निधन झाले आहे.

दीर्घकाळापासून तो एका आजाराशी झुंज देत
होता. बंगळुरूमधील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सोशल
मीडियावर अभिनेत्री पूजा भट्ट हिने याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या अशा
अचानक जाण्याने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते यांना मोठा धक्का
बसला आहे.

दरम्यान फराझ खान या अभिनेत्याची सलमान
खान दीर्घकाळापासून मदत करत होता. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये हा
‘मेहंदी’ फेम अभिनेतावर उपचार सुरू होते, तेव्हा सलमानने त्याच्या सर्व
मेडिकल बिल्सचा खर्च स्वत: दिला होता. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी
कश्मिरा शाहने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!